You are currently viewing कवठण पाटील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

कवठण पाटील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

*रस्त्यालगत टाकण्यात आलेले चिरे अपघातास निमंत्रण*

 

*पंधरा दिवसात योग्य पद्धतीने काम न झाल्यास उपोषणाचा इशारा*

 

कवठणी :

 

नाबार्ड निधीतून मंजूर झालेल्या कवठण पाटे पूलाचे काम योग्य पद्धतीने, येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्यास उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी दिला आहे. दरम्यान, कवठण गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यालगत साईडपट्टी साठी टाकण्यात आलेले दगड अपघातास निमंत्रण ठरत आहेत, याकडेही सुधा कवठणकर यांनी लक्ष वेधले.

पाटे पुलासाठी गेली अनेक वर्ष ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी गावातील अनेकांचे योगदान आहे. नाबार्ड निधीतून सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा निधीतून होत असलेल्या या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कवठणकर यांनी केला आहे.

पहिल्याच पावसात अर्धवट स्थितीत असलेला हा पूल खचत असून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

गुणनियंत्रका मार्फत सद्यस्थितीत झालेल्या कामाची चौकशी व्हावी, येत्या पंधरा दिवसात योग्य पद्धतीने पुलाचे काम पूर्ण न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार असा इशारा सुधा कवठणकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा