You are currently viewing माझ्या कडे

माझ्या कडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी रामदास पवार (अण्णा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माझ्या कडे* 

 

तुला देण्यासाठी आता

शिल्लक नाही उरले

तुझे नाव माझ्या जणू

काळजात कोरले

 

अचानक तुझं जाणं

मला सोसवत नाही

चुकलं होतं माझं पण

आता तरी बोल काही

 

पुन्हा एकदा भेटायची

संधी मिळत नाही

कसं सारं सांगु तुला

हे मला कळत नाही

 

तुझ्यावाचून करमेना

जड झालं जगणे

नशिबात प्रेमच नाही

विरह प्रेमाचा भागणे

 

तुझ्या वाचून मला

खरचं करमत नाही

सोडुन तुझा रुसवा तू

आतातरी बोल काही

 

रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा