*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मुंबई*
मुंबई मुंबई
आपली मुंबई
काय सांगू बाई
तिची नवलाई
ढगांपर्यंत घरे
सुसाट वारे
लांबच लांब रस्ते
माणसांचे लोंढे
सर्वांचीच धावपळ
सारखी पळापळ
मोटार गाड्या लोकल
सुटलेल्या भरधाव
समुद्राच्या काठी
हिऱ्यासारखी लखलखणारी
आपली मुंबई
होत चालली विद्रूप
रोजच तिच्यावर
आदळत आहेत
माणसांचे लोंढे
होत आहे चेंगराचेंगरी
घातपात गुन्हे
मुंबई मुंबई
आपली मुंबई
देशाची शान आहे
महाराष्ट्राचा मान आहे
आपण मुंबईला
जपलं पाहिजे
वैभव परत
आणलं पाहिजे
कवयित्री
अनुपमा जाधव