देवगड येथे करिअर महोत्सव उत्साहात संपन्न
डॉ. भाई बांदकर यांची संकल्पना
देवगड
डॉ. भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून देवगड मध्ये करियर महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या करीअर महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन ॲड. अजित गोगटे यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी गुरुदेव परुळेकर, दया पाटील, संजय गोगटे , मोंडकर व डाॅ.भाई बांदकर उपस्थित होते. ॲड. अजित गोगटे यांनी करीअर महोत्सवाची गरज समजावून सांगितली. संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून व पुण्यातून आलेल्या मार्गदर्शक व स्टाॅलधारकांचे आभार मानले.माझ्या मुलाला कमी टक्के मिळाले आता पुढे काय ? हा प्रश्न आज करिअर महोत्सवात सुटला.दहावी बारावीचे नुकतेच रिझल्ट लागलेत त्यात नेहमीप्रमाणेच कोकण विभाग अव्वल स्थानावर आहे. आणि नापासांची संख्या अगदीच नगण्य व पास झालेल्या विद्यार्थी संख्येत कमी टक्क्यावाल्यांची संख्या अधिक आहे. या विद्यार्थ्यांना करीअरचे मार्ग आज मिळाले. त्यांच्यासाठीही करीअरची विविध दालने असतात याची माहीती करुन देण्यासाठीच हा करीअर महोत्सव डाॅ.भाई बांदकर यांच्या संकल्पनेतून देवगडमध्ये पहिल्यांदाच असा भव्य मार्गदर्शन ते ॲडमिशन असा करीअर महोत्सव साकार झाला.विद्या विकास मंडळ संचलित कार्यसम्राट आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे जन्मशताब्दी सोहळ्यातील एक पुष्प म्हणून ॲड. अजित गोगटे आणि परिवारातर्फे हा करीअर महोत्सव संपन्न झाला. यामध्ये देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील विद्यार्थी पालकांनी याचा लाभ घेतला. महोत्सवात महाविद्यालयीन शिक्षण यावर मार्गदर्शन व ॲडमिशन झाले. हाॅटेल मॅनेजमेंट, टुरिझम, फॅशन डिझायनिंग, इंटिरीअर डिझायनिंग, आयटीआय,काॅम्प्युटर यांचाही सहभाग होता. त्याचबरोबर किसान मोर्चातर्फे “शेती एक व्यवसाय” या करीअरवरही भर दिला आहे. फोटोग्राफी, पत्रकारिता अशा महत्वाच्या विषयावरील करीअर सांगितली गेली. सर्व कोर्स व करिअरसाठी एज्युकेशन लोनसाठी व प्रायव्हेट स्कॉलरशिप ही मदत दिली जाणार आहे.मुख्य म्हणजे “सायमलटेनिस एज्युकेशन” यावर विशेष मार्गदर्शन केले गेले. याचे विविध स्टाॅल कार्यक्रमस्थळी होते.हा कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत असल्यामुळे येणाऱ्या सर्व विद्यार्थी व पालकांना दुपारच्या भोजनाची विनामुल्य व्यवस्था केली होती.या कार्यक्रमाचे आयोजन सागर इव्हेंटस् – सागर बांदकर यांनी केले. श्री.संजय गोगटे व श्री.गुरुदेव परुळेकर याचे विशेष सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार ॲड.अजित गोगटे व मुख्य संचालक डाॅ.भाई बांदकर हे होते करीअर महोत्सव मार्गदर्शन ते ॲडमिशन एकाच छताखाली झाला.