नाबर शाळा ते खेमराज हायस्कुल रस्त्यावरील बाजूपट्टीचे काँक्रीटकरण व खड्डे बुजविण्यास सुरुवात…
बांदा
बांद्यात जल जीवन योजनेचे काम करण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे नाबर शाळा ते खेमराज हायस्कुल या रस्त्याची बाजूपट्टी कमकुवत तसेच रस्ता खड्डेमय झाला होता. दरम्यान याबाबत ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठाचे बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी संबंधित ठेकेदारकडे पाठपुरावा करत शाळा सुरु होण्यापूर्वी काँक्रिट करण्याची मागणी लावून धरली होती.
अखेर आजपासून या रस्त्यावरील बाजूपट्टीचे काँक्रीटकरण व खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
बांद्यात जल जीवन योजनेच्या कामासाठी रस्त्याच्या बाजूला खोदाई करण्यात आली होती. मात्र काम झाल्यानंतर बाजूपट्टी मजबुतीकरण तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात दिरंगाई करण्यात येत होती. याबाबत श्री काणेकर यांनी संबंधित ठेकेदाराला हे काम पूर्ण केल्याशिवाय इतर काम करू देणार नसल्याचा ईशारा दिला होता. अखेर हे काम आजपासून सुरु करण्यात आल्याची माहिती श्री काणेकर यांनी दिली आहे.
पावसाळ्यापूर्वी हे काम सुरु करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक तसेच स्थानिकातून समाधान व्यक्त होत आहे.