शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशाची संधी
सिंधुदुर्गनगरी,
जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागा अंतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला अशा 3 ठिकाणी तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 5 ठिकाणी आहेत. या 8 शासकीय वसतिगृहामध्ये विदयार्थी / विद्यार्थीनीना सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे.
या वसतिगृहामध्ये इयत्ता 8 वी ते इयत्ता 12 वी चे वर्ग सुरु झाले आहेत. तरी मागासवर्गीय मुलां मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी / विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे.
मागासवर्गीय गरजू विद्यार्थी, विद्यार्थीनींना वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतीगृहातील गृहपाल, अधीक्षीका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२-२२८८८२) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केले आहे.