बांदा य बस स्थानकात आरक्षण सुविधा उपलब्ध करा – रियाज खान:
विविध समस्याबाबत वेधले आगार व्यवस्थापकाचे लक्ष..
बांदा
बांदा येथील मध्यवर्ती बस स्थानकात अनेक समस्या असून या स्थानकात बस आरक्षण सुविधा उपलब्ध करावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन शिवसेनेच्या (ठाकरे गट) अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी वाहतूक नियंत्रक यांना दिले. सावंतवाडीचे डेपो व्यवस्थापक श्री शेवाळे यांनी येत्या आठ दिवसात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, दोडामार्ग, सावंतवाडी आणि गोव्याकरिता बांदा बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून येथून पुणे, मुंबई, गोवा, लातूर अशा अनेक बसेस मार्गस्थ होतात. मात्र हे मध्यवर्ती ठिकाण असूनही प्रवासी वर्दळ जास्त असूनही सदर बस स्थानकावर बस आरक्षण (बुकिंग) करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर जाण्याकरिता बस आरक्षण करण्याकरिता मुद्दामहून खर्च करून वेळेचा अपव्यय करून सावंतवाडी बस स्थानक गाठावे लागते. त्यामुळे याठिकाणी आरक्षण सुविधा उपलब्ध करावी.
सध्या बांदा बस स्थानाकात दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक आहे. शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी विध्यार्थाना दोन्ही सत्रात पास वितरित केले जावेत. पास नाकारू नयेत. तसेच बांदा बस स्थानकावर गाड्यांची वेळ अनाउंस करण्याकरिता साऊंड सिस्टीम उपलब्ध नाही. अशा अनेक समस्या बांदा बस स्थानका ला भेडसावत आहेत. तरी याकडे एसटीच्या वरिष्ठ अधीकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
महामंडळाने बस स्थानक स्वच्छता आणी इतर बाबी करिता बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबविले होते. त्यात या गोष्टी अंतर्भुत होत्या, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तरी त्वरित बस आरक्षणाकरिता बुकिंग सुविधा आणी अनाउंस सिस्टीम त्वरित सुरु करावी, जेणेकरून प्रवाशांना याचा फायदा होईल.
यावेळी राजा खान, गिरीश नाटेकर, साहिल खोबरेकर, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, राहुल माने, रफिक शेख, न्हानू शेर्लेकर आदी उपस्थित होते.