You are currently viewing अमित अरुण बैकर यांना सायंटिस्ट ऑफ द इयर‘ 2024 पुरस्कार प्रदान

अमित अरुण बैकर यांना सायंटिस्ट ऑफ द इयर‘ 2024 पुरस्कार प्रदान

अमित अरुण बैकर यांना सायंटिस्ट ऑफ द इयर‘ 2024 पुरस्कार प्रदान

दापोली :-

सोसायटी फॉर अ‍ॅडवान्सड रिसर्च इन प्लॅन्ट सायन्सेस – मध्य प्रदेश यांजकडून दिला जाणारा या वर्षीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार ’सायंटिस्ट ऑफ द इयर‘ हा दापोलीतील अमित अरुण बैकर यांना प्रदान करण्यात आला आहे. अमित बैकर हे दापोली तालुक्यातील देवके गावचे रहिवासी असून त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे. त्यांना तरुण व्यावसायिक पुरस्कार व डॉ. एच. एस. पृथी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये गौरवण्यात आले आहे. त्यांचे अनेक संशोधन लेख हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अमित बैकर यांचं शिक्षण डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात झाल आहे. 2015 साली त्यांनी कृषी कीटकशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या ते युपीएल लिमिटेड, मुंबई या नामांकित कृषी कंपनीमध्ये संशोधन नियामक व विकास या विभागामध्ये कार्यरत आहेत. त्यांचे आई-वडील हे देवके गाव, ता. दापोली येथे स्थायिक आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने दापोली तालुक्याचे नाव हे देशपातळीवर झळकले आहे. त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा