देवगड ग्रामीण रुग्णालय समोर दुचाकी स्वाराला धडक देऊन टेम्पो चालक पसार
देवगड
कासार्डे येथील महालॅब मध्ये रक्त नमुने तपासणीसाठी घेऊन जाण्यासाठी देवगड तालुक्यातील रुग्णालयातून जमा केलेले रक्त नमुने घेऊन जाण्यासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात येत असताना रक्त नमुने घेऊन जाणाऱ्या मनोज भावे यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली.या झालेल्या अपघातात मनोज यशवंत भावे (३९)राहणार नारिंग्रे तांबळवाडी त्यांच्या उजव्या हाताला व उजव्या पायाला दुखापत झाली आहे . उजव्या हाताला फॅक्चर देखील झाले आहे. अपघातात धडक देणारा टेम्पो तेथे न थांबता तेथून निघून गेला. हा अपघात देवगड ग्रामीण रुग्णालय समोर शनिवारी एकच्या सुमारास घडला.
या अपघातीतील जखमी भावे यांना रिक्षाचालक अजित किंजवडेकर पद्माकर भोवर, देवगड अर्बन बँक संचालक संजय बांदेकर ,बाळू बांदेकर, कौस्तुभ काळे, यांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मनोज भावे हे नारिंग्रे तांबळवाडी येथील रहिवासी असून ते देवगड तालुक्यातील रक्त नमुने घेऊन कासार्डे येथे महालॅब या ठिकाणी देण्याचे रोज काम करत होते. शनिवारी नेहमीप्रमाणे ते रक्त नमुने नेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात जात असतानाच रुग्णालयासमोरच त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.
भावे हे ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेने जाण्यासाठी आत वळत असतानाच मागवून येणाऱ्या टेम्पो ने जोरदार धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले.मात्र टेम्पो चालक तेथून सुसाट वेगाने पुढे निघून गेला. ग्रामीण रुग्णालयासमोरच उभे असलेल्या रिक्षाचालक व त्यांच्या सहकार्यानी त्यांना उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या अपघातात भावे यांच्या उजव्या हाताला व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उजव्या हाताला मोठा मार लागला असून 15 टाके पडले आहेत. दोन ठिकाणी फॅक्चर देखील आहे. हेल्मेट असल्याने त्यांच्या डोक्याला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.