*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कवीचा तुरूंगवास….!!*
सुखाच्या सीमा लांघण्यास
झुगारतो लाजेची वस्त्र
शब्दांच्या मायाजालात गुंफवत
उचलतो भूलीचे अस्त्र…
सैराट होऊन सैरभैर
आधार यमकांचा घेतो
बोच-या व्यथांची घालमेल
गळी तुमच्या उतरवतो..
तोल ढळला कवीचा
ज्वानीस कायम जपतो
भुलवण मनमुराद रूपाची
प्रेमिकेला डोहात भिजवतो..
आब मैत्रीचा जपून
आव प्रौढतेचा आणतो
भुरळीची मौज घेत
तुरूंगात बंदिस्त करतो..
रूप कविचे चित्तचोर
मोहनाचा तो जादुगार
उन्मादक हव्यासांच्या सादरीकरणाने
घडवितो तुमच्यात साक्षात्कार..
मोहिनीचा सुगंध पसरून
भुलवणीचा पाश फेकतो
कल्पनाविलासात कैद करून
तुरूंगदार ओढून घेतो..
बाबा ठाकूर धन्यवाद