You are currently viewing बांद्यात लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडले

बांद्यात लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडले

*बांद्यात लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडले*

*एकत्र येत केली बंधाऱ्याची साफसफाई*

बांदा:-

येथील निमजगा येथे मागील वर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांनी मागणी व पाठपुरावा करत लघुपाटबंधारे विभागाकडून येथील बंधाऱ्यावर लोखंडी प्लेट चा बांध घालून घेतला होता. ज्यामुळे पाण्याची साठवणुक होऊन निमजगा,गवळीटेंब, शेटकरवाडी,गणेश नगर या सर्व भागातील विहीरींमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. तसेच या वाड्यांमधील सार्वजनिक नळधारकांना मागील वर्षभर पाणीपुरवठ्याची मुबलक सोय करण्यात आली. ज्यामुळे मागील संपूर्ण वर्षभर या परिसरात पाण्याचा तुटवडा भासला नाही.

आता पावसाळा जवळ आल्याने सदर लोखंडी प्लेट वेळेत काढणे महत्वाचे होते. अन्यथा येथील शेत जमिनींचे नुकसान झाले असते. त्यामुळे याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत बांदेकर यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांनी सामाजिक जबाबदारी ओळखत लोकसहभागातून या लोखंडी प्लेट काढुन, बंधाऱ्यात साठलेला कचरा, गाळ काढत परिसराची स्वच्छता देखील केली.त्यामुळे या तिन्ही वाड्यातील लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री.प्रशांत बांदेकर,हेमंत दाभोलकर, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी मोहन सावंत,अजय आईर,अवधुत मेस्त्री यांनी सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा