ओरोस :
जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत आंतरराष्ट्रीय वृक्षारोपण दिनाचे आयोजन ५ जून रोजी एच. बी गायकवाड, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यावेळी मा. श्रीम. व्ही एस देशमुख जिल्हा न्यायाधीश – २ व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग मा. श्रीम. ए बी कारंडे दिवाणी न्यायाधीश (व स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग – ओरोस तसेच मा. प्रशांत माळकर, कोर्ट मॅनेजर सिंधुदुर्ग – ओरोस प्रबंधक, अधिक्षक व जिल्हा न्यायालय संकुलातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. श्री अनिल चव्हाण वनपाल, श्री उत्तम कांबळे वनरक्षक प्रियंका पाटील वनरक्षक हे देखील यावेळी उपस्थित होते. मा. श्रीम. व्ही एस देशमुख, जिल्हा न्यायाधीश – २ व सत्र न्यायाधीश सिंधुदुर्ग ओरोस, मा. श्रीम. ए बी कारंडे दिवाणी न्यायाधीश (व स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर न्यायालय संकुलातील सर्व कर्मचारी तसेच सर्व सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग लोक अभिरक्षक म्हणून विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे असे वृक्षारोपण झाले.