पाट हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबीराचे आयोजन…
कुडाळ
“इको क्लब ऑफ मिशन लाईफ” या शासनमान्य उपक्रमांतर्गत पाट हायस्कूलमध्ये ५ ते ११ जून या कालावधीत उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राजन हंजनकर, इको क्लब प्रमुख संदीप साळसकर, यज्ञा साळगांवकर, दिपिका सामंत, जान्हवी पडते, गुरुनाथ केरकर, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी यज्ञा साळगावकर यांनी रानभाज्यांचे महत्व त्याचप्रमाणे वृक्ष लागवडीचे महत्त्व याबाबतची माहिती मुलांना दिली. यावेळी चंद्रपूर येथील ताडोबा उद्यान सफर ही व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. दुसऱ्या दिवशी बिया संकलन आणि त्याचे रोपण तर तिसऱ्या दिवशी मशागत आणि साफसफाई असे उपक्रम घेण्यात आले. यापूर्वी जे विविध उपक्रम घेण्यात आले त्यांचे फोटो ही स्क्रीनवर मुलांना दाखविण्यात आले.