रोणापाल आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग प्रदर्शनाचे उद्घाटन…
रोणापाल येथील कृष्णा गावडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन..
बांदा
रोणापाल येथील युवा चित्रकार कृष्णा गावडे यांच्या पेंटिंगचे प्रदर्शन रोणापाल आर्ट गॅलरी मध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन रोणापाल सरपंच योगिता केणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी कृष्णा गावडे यांच्या कलेचे कौतुक केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार ममता चिटणीस, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे ग्रामपंचायत सदस्य योगेश केणी, मडूरा उपसरपंच बाळू गावडे, गजानन केणी, साहिल नाईक, अभिषेक कुणकेरकर, रामचंद्र गावडे, श्रृती गाड, अमोल शेगडे, अथर्व नाईक, तुकाराम मयेकर, अक्षय परब, अर्जुन रुबजी, सुरेश रूबजी, किशोर धुरी, देवेंद्र पालव, दिव्या पालव, वामन पालव, कनिष्का केणी, युगा पालव, घनश्याम गावडे, सुभाष भाईप, संतोष जाधव, सुधीर नाईक, मोहन गवस आदी उपस्थित होते.
यावेळी ममता चिटणीस म्हणाल्या, कोकणात ग्रामीण भागातील मुलांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे. प्रत्येकातील सुप्त कला ओळखून त्या कलेला व्यक्त होण्याची संधी दिली पाहिजे. कृष्णा गावडे याची पेंटिंग खूप सुंदर आहेत. त्याने अधिक शिक्षण घेऊन मेहनत केल्यास त्याला या क्षेत्रात उज्वल भविष्य असल्याचे सांगितले.
सुरेश गावडे म्हणाले, रोणापाल सारख्या ग्रामीण भागातील कृष्णा गावडे याची पेंटिंग आकर्षक आहेत. या क्षेत्रात नाव कमविण्याची त्याला संधी आहे. यासाठी सर्वांनी त्याला सहकार्य करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. कृष्णा गावडे हा आत्ताच विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला असून कला क्षेत्रात करिअर करणार असल्याचे सांगितले.