You are currently viewing गुडबाय २०२०…..???

गुडबाय २०२०…..???

२०२०जगासाठी लक्षात रहाणारं वर्ष. जगातील कोणत्या ना कोणत्या देशावर अनेक प्रकारची अनपेक्षीत संकटं येत असतात… मात्र २०२०मधील कोरोना महामारीचं संकट हे महाभयंकर आणि विश्वव्यापी आहे…त्याची भयानकता दहा महिन्यानंतरही कमी झालेली नाही. मात्र याचा सगळ्याचं देशानी आपापल्या स्तरावर सामना केला..करत आहेत.यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की १३०कोटी लोकसंख्या असलेला हा आपला महाकाय भारत देश.अपुऱ्या आरोग्यविषयक साधनसुविधांच्या बळावर या महाराक्षसाविरूध्द लढला आणि यावर मोठ्या प्रमाणात मातही केली..अर्थात याचं श्रेय आरोग्य यत्रंणा,शासकीय यंत्रणा,सामाजिक संस्था याना आहेच पण इतर देशापेक्षा भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती ही शक्तीमान आहे ही गोष्ट अधोरेखित झाली.जगभरात या महामारीमुळे बळी पडलेल्यांची संख्या ही आठ लाखापेक्षा जास्त असून कोट्यवधी बाधीत झाले.कोरोना बाधित आणि त्यामुळे झालेले दुर्दैवी बळी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या शोकांतिका ह्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आहेत.
#कोरोनाने##काय##शिकवलं?
कोरोनाने बरचं काही शिकवलं.आरोग्य विषयक जनजागृती झाली.लुटमार करुन म्हणा किंवा कष्टाने मिळवलेला गडगंज पैसाही अशावेळी उपयोगी पडत नाही. याची जाणीव झाली.भौतिक सुखांचा अतिरेक आणि त्यासाठीची सतत धडपड आता थांबवली पाहिजे कारण या कोरोना महामारीत प्रत्येक क्षण जगण्यासाठीच धडपड करावी लागत होती.समाजातील चित्रविचित्र स्वभावाची माणसं असतात हे साहाजिकच आहे पण अशा चित्रविचित्र माणसांची अगदी जवळून आणखीन ओळख झाली. समाजसेवेचे बुरखे पांघरून सतत समाजविघातक काम करणाऱ्या काही उपद्रवी मुल्यांचा खरा चेहरा समजला.प्रसंगामध्ये एकमेकांना मदत करणे हा मनुष्यधर्म पण तोच पायदळी तुडवून अडचणीत असलेल्यांना नाहक त्रास देणारे समाजकंटक आणि खंडणीखोर या कोराना काळात अनुभवता आले.काही संवेदनशील लोकांनी अनेकांना मदतीचा हात पुढे केला..पण दुसऱ्या बाजूला हे संकट म्हणजे लुटमार करण्यासाठी आलेली संधी म्हणून अनेकांनी जमेल तेवढी लुटमार आणि गरजवंताचे शोषणही केलं.या महामारीनं आणखीन एक गोष्ट अधोरेखित केली..तुम्ही कुणालातरी मदत केली असेल म्हणून तुम्हाला कुणी मदत करेल हा भ्रम दुर झाला.एखादी घटना घडली असेल तर त्यावर नुसती तासनतास चर्चा आणि फोडणीसाठी फक्त मिर्चा यापलीकडे तुमच्यासाठी म्हणून निधड्या छातीने कुणीही पुढे येणार नाहीत…तुमची लढाई तुम्हालाच लढली पाहिजे.अगदी तुम्ही अनेकदा त्यांच्या उपयोगी पडला असलात तरी..अशी माणस फारचं स्वार्थी आणि आत्मकेंद्रि असतात.. नव्हे दुसऱ्याच्या घराला लागलेल्या आगीचा मनमुराद आनंद घेत असतात..पण त्याना याची कल्पना नसते कधीतरी एखादी पेटती काडी आपल्याही घरावरं पडणारं आहे.आपण आणि आपलं कुटुंब या पलिकडे अशा लोकांनी कधी विचारचं केलेला नसतो..पण जेव्हा त्यांना गरज लागते तेव्हा मग माणसं शोधायला सुरुवात करतात.. गेल्या काही वर्षात ही प्रवृत्ती जास्त वाढल्याने जाणीव नावांची गोष्टच संपलेली आहे.
समाजातील काही द्रुष्ट प्रव्रतीनी या काळात अनेक सामाजिक प्रश्न निर्माण करुन सामाजिक वातावरण दुषीत केल.याबाबत कितीतरी उदाहरणे देता येतील.प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे.प्रत्येकजण आपापल्या परिने आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेत होता.असचं एक नवविवाहित दांपत्य ग्रीनझोनमधून आपल्या आईवडिलांची व्यवस्था करुन येत होतं.त्याना त्या वाडीत त्या़च्या मित्राच्या रिकाम्या जागेत रहायला तिथल्या लोकांनी विरोध केला.म्हणून मी एका घरमालकाला समजावून व विनंतीकरुन ते दोघे सर्व काळजी घेऊन क्वाऱटाईन होतील असे समजावले..ते दोघे वयस्कर होते आणि त्यांच घर दुमजली स्वतंत्र व्यवस्था होती.ते तयार झाले पण एका शेजाऱ्यानेच त्याना भिती दाखवून त्यांना घाबरून सोडलं..आणि त्या आजीने नकार दिला..मग त्यांची दुसरीकडे व्यवस्था केली.अडचणीत सापडलेल्याना मदत करु नका पण त्यांना आणखीन अडचणीत आणण्याचं काम अशा अनेक शक्तिनं केलं.
अशा नकारात्मक घटना घडत असतानाच जात,धर्म,पंथ विसरून माणूसकीचं दर्शन देणाऱ्या अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मुंबई सारख्या शहरात कोरोनात बळी पडलेल्या कितीतरी बेवारसांचे अंतिम संस्कार आमच्या मुस्लिम बांधवांनी त्या त्या धर्मियांच्या रितीरिवाजानुसार पार पाडले.तेव्हा त्यांनी ना धर्म पाहिला ना जात…धर्म एकचं माणूसकी… सगळ्या भारतीयांच्या रक्ताचा रंग एकच…लालरंग..
या भीषण आणि जन्माची अद्दल शिकवणाऱ्या या महामारीचा अजून अंत झालेला नाही. यावर लस संशोधनाची जागतिक स्पर्धा होवून काही देशानी प्रत्यक्षात लस वापरात आणायला सुरुवातही केली.आपल्या देशानेही यात आघाडी घेतलेली आहे.या महामारीने सामाजिक, आर्थिक आणि रोजच्या जगण्याचेही अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत.२०२१मध्येही या अडचणीना सगळ्यानाचं सामोरे जायचं आहे.२०२०मधील कटू आठवणी..अनुभव ही शिदोरी घेऊन आपण२०२१चं स्वागत करताना येणारी आव्हाने पेलण्यासाठी नव्या दमाने नवी उर्जा घेऊन सज्ज व्हायचं आहे…आणि जमल्यास हा सुध्दा संकल्प करावयाचा आहे कि निदान २४तासापैकी माझ्यासाठी २३तास ५५ मिनीटे जगलो असेन तर दुसऱ्यासाठी,ज्या समाजात आपण रहातो त्या समाजासाठी निदान पाच मिनीटे तरी जगुया आणि आत्मिक समाधान घेऊया.
सर्वाना,अर्थात हितचिंतकाना आणि खास करुन माझ्या हितशत्रुनाही नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…
GOODBYE 2020…
WELCOME 2021
….अँड.नकुल पार्सेकर..

प्रतिक्रिया व्यक्त करा