You are currently viewing कवितेचं पीक

कवितेचं पीक

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कवितेचं पीक*

 

आभाळात ढग यावेत

तसे विचार येत गेले मनात.

आणि कविता होऊन

उतरत गेले

कागदावर.

 

 

अनेक होते विचार :

काही होते अनुभव

काही जाणिवा

सगळयांची होत होती

डोक्यात सरमिसळ .

आणि आकारत होत्या

कविता.

 

 

पावसाच्या, पाण्याच्या ,

शेतीच्या,मातीच्या,

डोंगराच्या ,सागराच्या,

रानाच्या,पानाच्या

पशूंच्या, पक्षांच्या,

ताऱ्यांच्या,वाऱ्यांच्या

कविताच कविता.

जणू कोसळत होता

कवितांचा पाऊस !

 

 

आता सगळ्या कविता

डौलात उभ्या आहेत.

जणू रानात असलेलं

भरदार पीक !

प्रतिक्रिया व्यक्त करा