You are currently viewing फुटबॉल खेळताना सावंतवाडीत युवक जखमी, पायाला गंभीर दुखापत…

फुटबॉल खेळताना सावंतवाडीत युवक जखमी, पायाला गंभीर दुखापत…

फुटबॉल खेळताना सावंतवाडीत युवक जखमी, पायाला गंभीर दुखापत…

सावंतवाडी

फुटबॉल खेळताना आदळल्याने सावंतवाडीत युवक जखमी झाला आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. नागेश गावडे (वय २४, रा.जिमखाना) असे त्याचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. नेहमी प्रमाणे तो आपल्या सहकार्‍या समवेत जिमखाना मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. यावेळी किक मारताना पाय जमिनीला आदळल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी त्यांच्या सहकार्‍यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा