You are currently viewing युगांडाने पीएनजीचा तीन गडी राखून पराभव केला, रियाजतची संथ कामगिरी

युगांडाने पीएनजीचा तीन गडी राखून पराभव केला, रियाजतची संथ कामगिरी

*युगांडाने पीएनजीचा तीन गडी राखून पराभव केला, रियाजतची संथ कामगिरी*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

टी२० विश्वचषक २०२४ चा नववा सामना गुरुवारी पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात युगांडाने २० चेंडू शिल्लक असताना तीन गडी राखून विजय मिळवला. गयाना येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पीएनजीचा संघ १९.१ षटकात ७७ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात युगांडाने १८.२ षटकांत सात गडी गमावून ७८ धावा केल्या आणि सामना जिंकला.

या सामन्यात पीएनजीची सुरुवात खराब झाली. संघाची धावसंख्या १९ धावा आणि तीन विकेट पडल्या. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रमजानीने कर्णधार असद वालाला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. यानंतर मियागीने सेसे बाऊला बाद केले. त्याला केवळ पाच धावा करता आल्या. कॉसमसने संघाला तिसरा धक्का दिला. त्याने टोनी उराला मुकासाकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याला एकच धाव करता आली. युगांडाविरुद्ध लिगा स्याकाने १२, हिरी हिरीने १५, चार्ल्स अमिनीने ५, किपलिन दोर्जियाने १२, चाड सोपरने ४, नॉर्मन वेनुआने ५, अली नाओने ५ धावा केल्या. तर, जॉन कारिको खाते न उघडता नाबाद राहिला. या सामन्यात युगांडाकडून अल्पेश, कॉसमस, मियागी आणि फ्रँक सुबुगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर ब्रायन मसाबाला एक यश मिळाले.

७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात चांगली झाली नाही. सहा धावांवर संघाने तीन विकेट गमावल्या. अली नाओने रॉजर मुकासाला पायचीत बाद केले. तो खाते न उघडताच तंबूमध्ये परतला. यानंतर वानुआने दुसऱ्याच षटकात रॉबिन्सनला आपला बळी बनवले. त्याला एकच धाव करता आली. नाओने तिसऱ्या षटकात समन सेसाजीला बाद केले. त्यालाही एकच धाव करता आली. या सामन्यात रियाजत अली शाह व्यतिरिक्त एकही फलंदाज खेळला नाही. त्याने ३३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, त्याचा स्ट्राईक रेट केवळ ५८.९२ धावाच राहिला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यात अल्पेशने ८ धावा, दिनेशने शून्य, जुमा मियागीने १३ धावा, केनेथने (नाबाद) सात धावा केल्या. ब्रायन खाते न उघडता नाबाद राहिला. पीएनजीकडून अली नाओ आणि नॉर्मन वानुआ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर चाड सोपर आणि असद वाला यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

*संवाद मीडिया*

*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2024-25)
========================
*12वी science* Regular batch
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Batch timing..
*सकाळी 8.30 ते 11.30*
*दुपारी 1.30 ते 4.30*
https://sanwadmedia.com/137185/

For 11th,12th *Special Batch*
*Maths / biology*
Timing 6 pm
========================
*12वी commerce* Regular batch
Subject
*Account, MCVC, Maths English*
*1 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे*
Btach timing
*सकाळी 9 वाजता*
*दुपारी 1.30 वाजता*
========================
*10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
Subject
*Maths, Science*
*English, Sanskrit*
बॅच सुरू.. *18 एप्रिल 2024 पासून*
========================
*इ 8वी आणि 9वी*
( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )
Subject
*Maths, Science, English, Sanskrit*
बॅच सुरू..*10 जून पासून सुरू*
========================
*11वी* ( Science / Commerce ) मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
(*Sci* Physics, Chemistry
Maths, Biology)
(*Com* Account, MCVC, Maths, English)
बॅच 3 जून पासून सुरू करत आहोत

( *आपले कॉलेज मधील admission निश्चित होई पर्यंत आपण फ्री lecture attend करु शकता. याची फी घेतली जाणार नाही* )
========================
*MHT -CET / JEE guidence*
========================

🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
ऑफिस 9422896719

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/137185/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा