You are currently viewing सकल मराठा समाजाच्यावतीने ९ तारखेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ तारखेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

सकल मराठा समाजाच्यावतीने ९ तारखेला विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

सावंतवाडी

येथील सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ९ जूनला यशवंतराव भोसले इंटर नॅशनल स्कूलच्या सभागृहात संध्याकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार निलेश राणे, युवा नेते उद्योजक विशाल परब, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले, भोसले नाॅलेज सीटीचे संस्थापक अध्यक्ष अच्यूत भोसले, प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कणकवली, देवगड, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, दोडामार्ग, येथून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रथम सत्कार करण्यात येणार आहे. शाल श्रीफळ, सन्मान पत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. तरी जास्तीत-जास्त गुणवत विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तरी नाव नोंदणी केलेल्या व ज्यांना नाव नोंदणी करने शक्य झाले नाही त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सिताराम गावडे, उपाध्यक्ष लक्ष्मण नाईक, सेक्रेटरी आकाश मिसार, खजिनदार समीर पाटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा