You are currently viewing नारायण राणे यांच्या विजयात महिला मतदारांचे मोठे योगदान – श्वेता कोरगावकर

नारायण राणे यांच्या विजयात महिला मतदारांचे मोठे योगदान – श्वेता कोरगावकर

नारायण राणे यांच्या विजयात महिला मतदारांचे मोठे योगदान – श्वेता कोरगावकर

मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मानले आभार..

बांदा

भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मतदारांचे योगदान मोठे असून यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे कि, महीला मोर्चाच्या प्रमुख चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला मोर्चाचे जिल्हा संघटनात्मक काम सुरू आहे. सौ. नीलम राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व महिलांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेऊन आगामी काळात महिलांना रोजगार, तरुणींच्या नोकरी संदर्भातल्या समस्या, शेतकरी बांधवांचे प्रश्न, खासदार नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न आमचे राहतील. या प्रचारादरम्यान नारायण राणे, रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सर्व मंडल अध्यक्ष, महिला मंडल अध्यक्ष, वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चाने काम केले. तसेच महायुतीच्या महिला पदाधिकाऱ्यांची मोलाची साथ लाभली.
यापुढे देखील महिला मोर्चाने असेच संघटितपणे काम करून पक्ष वाढीसाठी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन सौ. कोरगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा