खासदार,आमदार यांना अकार्यक्षम ठरवण्याचा अधिकार हा रणजित देसाई यांचा नसून तो जनतेचा आहे.; शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक यांचा टोला
कुडाळ / प्रतिनिधी :-
दोनवेळा खासदार, आमदार ह्या मतदार संघात निवडून आले ते कार्यक्षम असल्यामुळे जनतेने त्यांची पोच पावती देऊन जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून विश्वासाने आणले.त्यामुळे कार्यक्षम अकार्यक्षम म्हणण्याचा अधिकार जनतेने तुम्हाला दिलेला नाही . वराड सोनवडे ब्रिच हे प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर असून सुद्धा अपुर्या निधीच्या तरतुदीमुळे ठप्प होते. त्याकडे सुद्धा तुमचे नेते असलेले तत्कालीन पालकमंत्री दुर्लक्षच केले होते.खासदार महोदयांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्याला आवश्यक असलेला अतिरिक्त निधीची तरतूद करून देऊन त्या कामाला चालना दिली. सोनवडे पुलाचे काम आपण जाऊन पाहावे काम सुरु आहे त्या कामाची वर्क ऑर्डर निघून ठेकेदार निश्चित झाला आहे. जर आपण माणगावमध्ये जाऊन विशाल माहिती घेतली तर तुम्हाला समजेल.
झाराप येथे मुंबई विद्यापीठाची मागणी ही फार जुनी होती,परंतु तुमचे नेते तत्कालीन पालकमंत्री यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते ,खासदार विनायक राऊत साहेबांनी त्याला चालना देऊन जिल्हा प्रशासनाकडून जमीन उपलब्ध करून घेतली व ती विद्यापीठाच्या ताब्यात दिली हे सर्व काम खासदार राऊत साहेब महोदयांनी स्वत: पाठपुरवठा करून केले आपण जिल्हा पंचायत संसाधन केंद्राच्या कामाचे भूमिपूजन ऑक्टोबर २०१८ मध्ये झाले असे म्हणता परंतु वस्तुस्थिती अशी कि त्या भूमिपूजनाची तारीख १२/११/२०१८ अशी आहे. असे त्याठिकाणी लावलेल्या फलकावरून दिसून येते.
तसेच आपण फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका आधी झाल्या व संजय पडते व नागेंद्र परब यांचा अभ्यास कमी आहे व त्यांना मार्गदर्शन करणारे चुकीची माहिती त्यांना पुरवतात असा आरोप केलात, परंतु या भूमीपूजनानंतर अवघ्या पाच महिन्यातच आपण स्वाभिमान पक्षामार्फत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलात व तुमच्या नेत्याचा दारुण पराभव करून घेतलात यावरूनच आपली कार्यक्षमता कळते.
स्वाभिमान पक्षाच्या नेत्यांनी तुमच्याकडे मोठ्या विश्वासाने पक्षाचे कुडाळ तालुका अध्यक्षपद दिले आणि आपल्यामध्ये वशिल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद होते परंतु स्वतःमध्ये संघटनेचे काम करण्याची कार्यक्षमता नसल्यामुळे तुम्ही तात्काळ संघटनेच्या पदाचा राजीनामा दिलात व वशिल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे पद ठेऊन केवळ मिरवण्याचे काम केले. आपण ज्या मतदार संघातून निवडून आलात त्या मतदार संघात लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मताधिक्य मिळाले. त्याच्यातुनच कोण कार्यक्षम आहे याची जाणीव जनतेने तुम्हाला करून दिली.
घोडगे सोनवडे घाट हे जांभवडे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे स्वप्न होते. त्याकडे सुद्धा तुमचे नेते असलेले व तत्कालीन पालकमंत्र्यांनी दुर्लक्षच केले ते कामसुद्धा खासदार विनायक राऊत,तत्कालीन पालकमंत्री दीपकभाई केसरकर व आमदार वैभव नाईक यांनी यशस्वी पाठपुरवठा करून मंजूर करून घेतले.
व्याघ्र प्रतिष्ठानला आवश्यक असलेली रक्कम सुद्धा नवीन आलेल्या सरकारने आताच भरणा केलेली आहे त्यामुळे ते काम सुद्धा आता मार्गी लागले आहे त्यामुळे कदाचित विधानसभा निवडणुकीच्यावेळी ज्याप्रमाणे आपण श्री दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैध करवत आपण त्यांना बाजूला केले मुद्दाम उल्लेख करून आपण सांगून आपल्या सवभिमान भाजपाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी खासदार आमदार यांच्यावर तुम्ही टीका करतात,शिवसेना औषधाला शिल्लक राहणार नाही असे स्वाभिमानी भाजप नेत्ते म्हणत होते त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या नेत्याचा पराभव कसा होतो हे तुम्ही स्वतः पाहिलं आहे त्यामुळे यापुढे तुम्ही शिवसेनेच्या नादी लागू नये व आमदार खासदार यांच्यावर टीका करणं थांबवावं अन्यतः जश्यास तसा समाचार घेतला जाईल असे राजन नाईक म्हणाले.
ज्या मतदार संघातून तुम्ही निवडून येतात त्या मतदारसंघाची वाताहात करून दुसरा मतदार संघ शोधतात कारण दोन्ही मतदार संघामध्ये ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आणि आता ज्या मतदार संघाचे नेतृत्व करत आहात त्या मतदार संघाची वाट लावून आता तिसऱ्या मतदार संघाच्या शोधात आहात . असे सांगून नाईक म्हणाले आमदारकीचे स्वप्न भंगलेल्या माणसाने आता यापुढे कुठल्याही पक्षाचे नेतृत्व करू नये अशी जनतेच्या मनात इच्छा आहे त्यामुळे स्वाभिमान भाजपाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी तुम्ही योग्य नाही . असे नाईक यांनी देसाई यांना फटकारले.