**जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आनंदाने झाड*
दारी लावले मी आनंदाचे झाड
हळूहळू वाढू लागले ते फार
आनंदाच्या झाडाला घालते रोज पाणी
तेव्हा सुचतात सुंदर गाणी
त्याला आली सुंदर फुलं
आनंदली लहान थोर
झाडाला आली गोड गोड फळ
जगण्यासाठी मिळाले बळ
झाडावर येतात पशू पक्षी
निसर्ग माझा सोबती
झाडावर येतात पशू, पक्षी
निसर्ग माझा सोबती
झाडाखाली येतात,गुरे वासरं
घर माझे झाले हासरं
आपण ही लावा दारी आनंदाचे झाड
सावल्या मिळतील गार गार
अनुपमा जाधव