*काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सौ. संगिता मुसळे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झुला भावनांचा*
हे जीवन म्हणजे
सुख दुःखाचे चक्र
कधी कधी होतसे
दैवाची दृष्टी वक्र
कधीही जाऊ नये
खचून घाबरून
योग्य निर्णय घेता
जाशील रे जिंकून
सुख समाधानाच्या
वाटेवरची नाव
जीवन जगतांना
आडवी येई हाव
जीवन तर असे
झुला भावनांचा
मनात समाधान
हा मार्ग आनंदाचा
प्रत्येक क्षण माझा
पक्के ठरव मनी
मिळेल मग खरा
आनंद हो जीवनी
सौ. संगीता शामकांत मुसळे, नाशिक.