बांद्यात भाजपकडून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष…
बांदा
महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने बांदा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच मिठाई वाटून आनंद साजरा केला. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत, माजी सभापती शीतल राऊळ, मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, भाजप बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, प्रशांत बांदेकर, रुपाली शिरसाट, देवल येडवे, तनुजा वराडकर, स्मिता पेडणेकर, राखी कळंगुटकर, गुरु कल्याणकर, आत्माराम गावडे, अभिषेक देऊलकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, नितेश पेडणेकर, साई सावंत, माजी सरपंच दीपक सावंत, अक्षय मयेकर, रमेश सावळ, शुभम साळगावकर, सर्वेश मुळ्ये आदिंसह भाजप व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.