१७ व्या फेरीनंतर नारायण राणे यांची विजयाच्या दिशेने कूच ; ४१,२२१ मतांची आघाडी
रत्नागिरी –
सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुसंडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १७ व्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केला असून १७ व्या फेरी अखेर नारायण राणे हे ४१,२२१ मतांनी आघाडीवर आहेत. १७ व्या फेरी अखेर नारायण राणे यांना ३,३०,३२३ तर विनायक राऊत यांना २,८९,१०२ मते मिळाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी तर रत्नागिरी जिल्ह्यात विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.