You are currently viewing स्वामी आहेत ना! या कथासंग्रहाचे संगणक तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत सामंत यांच्या हस्ते प्रकाशित !

स्वामी आहेत ना! या कथासंग्रहाचे संगणक तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत सामंत यांच्या हस्ते प्रकाशित !

मुंबई –

खरं तर प्रत्येकाच्या जीवनात स्वामी आहेत. अशी भावना सर्वत्र असल्याने अशा पुस्तकांतून आपणास संस्कार मिळतात. त्यामुळे संस्कारीत पुस्तकांची आवश्यकता असून जीवनांतील वास्तव व समतोल आल्याने वाचकाला वाचताना आनंद मिळतो. असे संगणक तज्ज्ञ प्राध्यापक हेमंत सुधाकर सामंत यांनी लेखक अजय पांडुरंग शिंदे लिखित ‘स्वामी आहेत ना ! या कथासंग्रहाचे पार्टी सभागृह मालाड (पश्चिम) येथे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी बोलताना सूचित केले. प्रारंभी दिपप्रज्वलन प्राध्यापक हेमंत सामंत ,साहित्यिक व विचारवंत विश्वास धुमाळ, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रकाशक गुरूनाथ शेट्ये, लेखक शैलेंद्र पवार, साहित्यिक संदेश चव्हाण आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रा. हेमंत सामंत पुढे म्हणाले ,आज पुस्तकाचे प्रकाशन करीत असताना वेगळा ट्रेंड निर्माण करण्यात आला. असून या मागची संकल्पना खूप सुंदररित्या रेखाटली आहे. यांचे मला साक्षीदार होता आले. तसेच पुस्तकाला Sibn प्राप्त झाल्याने अजय शिंदे यांचे नांव जागतिक दर्जावर पोहचले आहे.आजवर प्रकाशक गुरूनाथ शेट्ये यांनी चारशे पुस्तके प्रकाशित केली आहेत.असा हा कौतुक सोहळा असल्याचे नमूद केले. कथासंग्रहाला ज्यांनी प्रस्तावना लिहिली ते साहित्यिक विश्वास धुमाळ यांनी सांगितले की, लेखक अजय शिंदे यांनी आश्र्चर्याचा धक्का दिला आहे. कथा सुंदर पध्दतीने लिहियला असून पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. प्रेम दोघांचे त्यात वेगळेपण आहे. त्यामध्ये प्रवित्र भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.आपण आजपर्यंत बरेच पुस्तक सोहळे पाहिले पण आजचा प्रकाशन सोहळ्याची पद्धत कायम स्मरणात राहील असे नमूद केले. जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, साप्ताहिक कोकण वैभवचे स्वर्गीय संपादक सुधाकर सामंत यांनी दिवाळी अंकातून अजय शिंदे यांच्या कवितांना प्रसिद्धी दिल्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर प्रगती साधली. आजच्या दिवशी शिंदे कथा लेखक म्हणून पुढे येताना दिसत आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. लेखक अजय शिंदे यांनी खरं तर आजचा दिवस माझासाठी आश्र्चर्याचा सुखद धक्का आहे. या निमित्ताने स्वर्गीय संपादक सुधाकर सामंत आणि माझे पत्रकार मित्र प्रमोद कांदळगावकर यांच्यामुळे हा सोहळा घडवून आला. म्हणून ‘स्वामी आहेत ना! हा कथासंग्रह प्रकाशित होऊ शकला असे सांगितले. या प्रसंगी लेखक शैलेंद्र पवार,साहित्यिक संदेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या संयोजिका कविता अजय शिंदे यांनी मान्यवरांचे शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर सोहळा यशस्वी होण्यासाठी रेणुका उघडे, विजयसिंह, प्रभात पवार यांनी परिश्रम घेतले. रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन माधव गायकवाड यांनी अतिशय मार्मिक शब्दांत केले. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वाचक प्रेमींनी गर्दी केली होती.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा