*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*परंपरेच्या शापित बेड्या*
अधिकाधिक मजबूत
परंपरेच्या शापित बेड्या
स्रिया वेड्या
बाळगतात…
शिक्षण सुधारणा
कितीही झाले तरी
काहूर अंतरी
परंपरांचे…
जुन्या परंपरांनी
स्रियांचे व्यक्तीमत्व खचते
मागे ओढते
प्रगतीला….
बदलत नाही
जोपर्यंत समाजाची मानसिकता
आहे अपरिहार्यता
जीवनात….
सुधारणा भौतिकात
घडवावे मनाचे उन्नयन
शापित वचन
परंपरेचे….
स्वतः जाणावे
कर्तृत्वाचे आपण बळ
परंपरेचा उधळ
कट….
शापित बेडी
बौध्दिक उन्नतीने तोडावी
जगाला दाखवावी
अस्मिता…..!!
अरुणा दुद्दलवार@✍️