**जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन*
मन कुठेही कसंही
भरकटत असतं
नदी सारखं खळाळत असतं
वाऱ्यासारखं भरारतं असतं
कधी कधी मन
घेऊन जातं उंच महालात
तर कधी
फाटक्या झोपडीत
मन होऊन जातं कधी
समुद्राच्या विक्राळ लाटा
तर कधी
डोंगर रानातल्या
हिरव्यागार पाऊलवाटा
मन आभाळात जातं
मातीवर येतं
झाडावर
फुलांवर बसतं
तर कधी
खडकावर आदळतं
पण मन तेच खरं
जे होतं नाही
विजयांनी उन्मत्त
आणि खचत नाही
पराभवांनी
अनुपमा जाधव