नारायण राणे यांना 7000 मतांनी आघाडीवर
रत्नागिरी –
सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्यात काटेंकी टक्कर पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरीची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जारी केली असून चौथ्या फेरी अखेर नारायण राणे हे 7818 मतांनी आघाडीवर आहेत. चौथ्या फेरी अखेर नारायण राणे यांना 111369 तर विनायक राऊत यांना 103551 मते मिळाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही मतदार संघात नारायण राणे तर रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात विनायक राऊत यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.