You are currently viewing आर टी ओ कार्यालयाच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त वाहनांवर पावणे दोन लाख रुपयांचा दंड वसूल

आर टी ओ कार्यालयाच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त वाहनांवर पावणे दोन लाख रुपयांचा दंड वसूल

आर टी ओ कार्यालयाच्या कारवाईत १०० पेक्षा जास्त वाहनांवर पावणे दोन लाख रुपयांचा दंड वसूल

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा..

ओरोस
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी मालवाहू वाहने, मुंबई गोवा प्रवासी वाहतूक करणारी प्रवासी वाहने यांची तपासणी केली जात आहे. आतापर्यंत मोहिम अंतर्गत १०० पेक्षा जास्त वाहनांची तपासणी करून पावणे दोन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेत प्रवासी वाहनांची वैद्य वाहन परवाना नसणे, परमिट नसणे, वाहनामध्ये आपत्कालीन दरवाज्याच्या मार्गात अडथळा असणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, वैद्य वाहन बॅच बिल्ला नसणे, वाहनांना परावर्तिका नसणे तसेच विहित गणवेश धारण न करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच महामार्गावर ठिकठिकाणी ‘अल्कोहोल चाचणी मशीन’ द्वारे चालकांची मद्यपानाची तपासणी करण्यात आली.
चालकांना मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. यावेळी सुमारे १०० पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करून त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहनांकडून पावणेदोन लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक ही सचिन पोलादे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, अमोल दांडेकर व वाहनचालक संजय केरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा