You are currently viewing वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली

*वेंगुर्ले शहरातील वाढत्या दुचाकी चोरी प्रकरणी भाजपा शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाची भेट घेतली*

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.*

*शहरातील सर्व सि.सी. टिव्ही कॅमेरे लवकरात लवकर सुरु करण्याची आग्रही मागणी* .

वेंगुर्ले शहरात होणाऱ्या दुचाकी चोरीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंद स्थितीत असलेले सि.सि.टिव्ही कॅमेरे सुरु करणे बाबत , तसेच शहरातील रात्रीची गस्त वाढविणे बाबत चर्चा करण्यासाठी वेंगुर्ले भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर केले .
या निवेदनात असे म्हटले कि ,
वेंगुर्ले शहरात भरवस्तीमधुन दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढत आहे . गेल्या दोन महिन्यांत दुचाकी चोरीच्या चार घटना घडल्या आहेत .
शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी शहरातील मेन रोड वरील महालक्ष्मी अपार्टमेंट समोर अच्चुत मेस्त्री यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली असून , अजुन चोरीचा तपास लागलेला नाही .
वेंगुर्ले शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बसवलेले सि.सि. टीव्ही कॅमेरे हे काही ठिकाणी बंद स्थितीत आहेत .ते ताबडतोब सुरु करण्यात यावेत . तसेच शहरामध्ये रात्रीच्या वेळी पोलीस गस्त ही वाढविण्यात यावी , जेणेकरून चोरीवर आळा बसु शकेल .
तरी दुचाकी चोरीचा तपास करून , चोरट्यांना जेरबंद करावे व वेंगुर्ले शहर वासीयांना भयमुक्त करावे . अशी मागणी केली .
यावेळी भाजपा प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मा.नगराध्यक्ष राजन गिरप , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , महीला मोर्चाच्या सुजाता पडवळ व वृंदा गवंडळकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व प्रसाद नाईक , मा.उपनगराध्यक्ष अभी वेंगुर्लेकर , ओबीसी सेल चे प्रमोद वेर्णेकर., बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर , भुषण सारंग इत्यादी उपस्थित होते .

 

*संवाद मिडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*📢प्रवेश सुरू…!! 📢प्रवेश सुरू…!!📢प्रवेश सुरू…!!*📣📢

*_⚕नर्सिंग असिस्टंट कोर्स साठी प्रवेश सुरू…!!👩‍⚕👩‍⚕_*

*☸️राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी☸️ मध्ये प्रवेश सुरू…!!💫*

https://sanwadmedia.com/137110/
*✍️ शैक्षणिक पात्रता:-*
▪️१० किंवा १२ पास
▪️वय १८ ते ४५
▪️कोर्सचा कालावधी नऊ महिने

_👉 ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी कमी फी मध्ये 100% शासनमान्य नर्सिंग असिस्टंट कोर्स सर्टिफिकेट…!!_

_👉प्रायव्हेट हॉस्पिटल, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हेल्थ केअर सेंटर, एनजीओ संस्था या ठिकाणी नोकरीची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

_👉होम बेस केअर व्यवसाय सुरू करण्याची संधी…!!_ …!!👩‍⚕👩‍⚕

*👩‍🔬नर्सिंग असिस्टंट कोर्सची वैशिष्ट्ये:-*
_🔸शासनमान्य सर्टिफिकेट 📑_
_🔹सोईस्कर ट्रेनिंग शेड्युल 📈_
_🔸अनुभवी तज्ञाचिकित्सांचे मार्गदर्शन 👨‍⚕️_

*_📌मर्यादित जागा, त्यामुळे आजच संपर्क करून आपली जागा बुक करा…!!_*

*🏥आमचा पत्ता:-*👇

*राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे रुग्णालय, सावंतवाडी खासकीलवाडा सुतिकागृह परिसर.*

*☎️संपर्क:-*👇 *०२३६३-२७२३०२/२७२०८५/*
*📲९४२११४६७९७*
*📲९४०४७४०६०६*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137110/
————————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा