You are currently viewing न्यायालय परिसरातील रस्त्यावर आलेला भला मोठा वृक्ष तोडण्यास सुरुवात

न्यायालय परिसरातील रस्त्यावर आलेला भला मोठा वृक्ष तोडण्यास सुरुवात

न्यायालय परिसरातील रस्त्यावर आलेला भला मोठा वृक्ष तोडण्यास सुरुवात

सावंतवाडी

येथील न्यायालय परिसरात असलेला ब्रिटीशकालीन “रेन ट्री” हा भला मोठा वृक्ष आज तोडण्यात येणार आहे. या कामाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुन्या मुंबई गोवा महामार्गावरून होणारी वाहतूक बाजारपेठेतून वळविण्यात आली आहे. एकाच बाजूला सर्व वाहतूक वळण्यात आल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. झाडे तोडण्यासाठी वीज वाहिन्या उतरून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहे.

सावंतवाडी शहरात असलेली जुनाट व धोकादायक झाडे तोडण्यात यावीत, अशी मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सावंतवाडी न्यायालय परिसरात असलेले झाड तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज सकाळपासून त्यासाठी सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी त्या झाडावर मधाचे मोठे पोळे असल्यामुळे रात्रीपासून मधमाशांना हाकलून लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते. दरम्यान या झाडाच्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या फांद्या तोडण्यात येणार आहेत. हे काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी होणारी वाहतूक रोखण्यात आली असून बाजार पेठ मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आहे. दुसरीकडे झाड तोडण्यासाठी वीज वाहिन्या उतरवण्यात आल्या असल्यामुळे शहरात वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे ऐन गर्मीच्या हंगामात अंगाची लाही-लाही होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा