You are currently viewing महसूलच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अवैध उत्खनन वाहतूक सुरू – परशुराम उपरकर

महसूलच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अवैध उत्खनन वाहतूक सुरू – परशुराम उपरकर

महसूलच्या आशीर्वादाने सावंतवाडीत अवैध उत्खनन वाहतूक सुरू – परशुराम उपरकर

अन्यथा न्यायालयात जावे लागेल, तहसीलदारांना इशारा…

सावंतवाडी :

सावंतवाडी तालुक्यात पडवे माजगाव येथील अनधिकृत उत्खनन, आंबोलीतील अवजड वाहतुक तसेच इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात होणारी बेकायदा डंपर वाहतूक, अनधिकृत खाणी, कॉरी ओव्हरलोड वाहतूक व तालुक्यात सर्व होणा-या अनधिकृत प्रकारांकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर तहसिलदार यांच्याकडून कोणतीही दंडात्मक कारवाई अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. महसुल प्रशासनाचे हात ओले झाले आहेत असा आरोप माजी आमदार परशुराम उर्फ (जी.जी) उपरकर यांनी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेत केला.

पडवे माजगाव अनधिकृत मायनिंग उत्खनन तसेच सावंतवाडी तालुक्यातील विविध प्रश्नां संदर्भात श्री. उपरकर यांनी सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार, मंदार नाईक, विजय जांभळे, प्रवीण गवस, सुरेंद्र कोठावळे, आबा चिपकर, नंदू परब, सुनील नाईक, संदेश सावंत, स्वप्नील जाधव, ज्ञानेश्वर नाईक.आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपरकर यांनी महसूल विभागला लक्ष्य करताना सावंतवाडी तालुक्यात शासनाचे नियम डावलून बरेच गैर प्रकार होत आहेत त्यावर महसून विभागाचा अंकुश नाही. ओव्हरलोड वाहतूक प्रश्नी कारवाई करण्याचा दिखावा करण्यात आला मात्र आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई करुन तहसिलदार यांनी किती महसूल शासनास मिळवून दिला हे पुराव्यांसहीत सादर करावे. आंबोली घाट अवजड वाहतूकीसाठी बंद असून देखील पोलीस व महसूल प्रशासन आरटीओ विभागाच्या आशीर्वादाने खुलेआम रात्रीच्या वेळी वाहतूक सुरु आहे त्यावर प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी काय कारवाई केली असा प्रश्न उपरकर यांनी केला. पडवे माजगाव इकोसेन्सिटीव्ह क्षेत्रात अनधिकृत मायनिंग उत्खनन झाले त्यावर प्रांत, तहसिलदार महसूल प्रशासनाने कोणती दंडात्मक कारवाई केली हे मायनिंग अनधिकृतरित्या दोडामार्ग तालुक्यात डंप करुन रेडीपोर्ट पर्यंत पोहोचवले गेले. या सर्व गैर प्रकाराला महसूल प्रशासनाचा आशिर्वाद होता तर त्या लोहखनिज वाहतूक करणा-या दीड हजार डंपरवर कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली. सावंतवाडी तालुक्यात अनधिकृत चिरेखाणी, कॉरी सुरु आहेत त्यावर आत्तापर्यंत तहसिलदार यांनी किती दंडात्मक कारवाई केली असा प्रश्न उपरकर यांनी केला. चिरेखाणी यांची तपासणी करुन दिलेल्या पास पेक्षा जास्त खोल उत्खनन सुरु आहे. विनापास वाहतूक सुरु आहे. त्याबाबत तहसिलदार यांनी पथक नेमले होते त्या कारवाईचे काय झाले. तालुक्यातील मळेवाड, कोंडुरे, धाकोरे, आजगाव, तळवणे भागात अनधिकृत चिरे उत्खनाबाबत ग्रामस्थांच्या तक्ररी आल्या आहेत. त्यावर महसूल प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे या खाणीवर कारवाई न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांना व जबाबदार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घेवून खाणीच्या ठिकाणी धडक देवू असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी दिला यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी अवजड, ओव्हरलोड, सावंतवाडी तालुक्यातील अनधिकृत चिरे खाणे व बिन पास वाहतुकीबाबत तलाठी यांचे पथक नेमून कारवाई केली जाईल. अनधिकृत कॉरी, खाणी यांना भेटी देवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार. पडवे माजगाव अनधिकृत उत्खनाबाबत लक्ष घालून कारवाई केली जाईल. आंबोली येथे २४ तास पथक नेमून कारवाई केली जाईल. तालुक्यातील प्रशासनाच्या व्यस्त कामामुळे कारवाई संदर्भात लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यावर श्री उपरकर यांनी आपले इतर कर्मचारी काय करतात? असा सवाल तहसीलदार पाटील यांना केला. मात्र आता कारवाईची मोहीम हाती घेतली जाईल असे आश्वासन तहसिलदार पाटील यांनी श्री उपरकर व उपस्थितांना दिला. तर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी फक्त प्रशासकीय काम करण्यासाठी महसूल विभाग नाही जिथे शासनाचा महसूल बुडत तिथेही लक्ष घालून प्रांत तहसिलदार यांनी दंडात्मक कारवाई करुन शासनाला जास्त महसूल उपलब्ध करुन दिला पाहिजे असे खडेबोल सुनावले.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा