You are currently viewing व्हिडिओ गेम पार्लर वरील पोलिसांची कारवाई थांबविण्यासाठी पंधरा लाखाची मागणी

व्हिडिओ गेम पार्लर वरील पोलिसांची कारवाई थांबविण्यासाठी पंधरा लाखाची मागणी

*व्हिडिओ गेम पार्लर वरील पोलिसांची कारवाई थांबविण्यासाठी पंधरा लाखाची मागणी*

*मनोरंजनासाठी खेळल्या जाणाऱ्या पार्लर चालकांना ब्लॅकमेल*

*जिल्हाधिकारी यांना निवेदन*

सावंतवाडी

पोलिसांकडून होणारी कारवाई थांबवतो असं सांगत सीताराम कदम या व्यक्तीकडून १५ लाखांची मागणी केली जात आहे. पैसै न दिल्यास धमकी दिली जात असल्याची तक्रार व्हिडिओ गेम पार्लर व्यवसायिक रविचंद्र पालकर, मुजीब शेख, आत्माराम सावंत यांनी कुडाळ पोलिस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचही लक्ष वेधलं आहे. व्हिडीओ पार्लर हा करमणूक या संज्ञेखाली येत असून तो मनोरंजनासाठी खेळला जातो. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवान्या नुसार आमचा व्यवसाय चालू असून होणारी कारवाई ही चुकीच्या पद्धतीने होत आहे‌. या व्यवसायवर अनेक कुटुंब अवलंबून असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करुन गुन्हा दाखल करावा अशी मागणी व्हिडिओ गेम पार्लर व्यवसायिकांनी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध तालुकांमध्ये आम्ही राहतो. आमचे अधिकृत व्हिडीओ गेम पार्लर चालवित असून आजपर्यंत कधीही पोलिसांनी कारवाई केली नव्हती. हे व्हिडीओ पार्लर हा करमणूक या संज्ञेखाली येत असून तो मनोरंजनासाठी खेळला जातो. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीची आर्थिक पिळवणूक किंवा कर्जबाजारी होण्याइतपत कोणती घटना घडलेली नाही. तर सीताराम जर्नादन कदम ही व्यक्ती दारुचे सेवन करून आमच्या मालकीच्या व्हिडीओ गेम पार्लर मध्ये येऊन आपण राजकीय पुढारी असल्याचे सांगून बळजबरीने पैसे खेळण्यासाठी मागत होते‌. व पैसे न दिल्यास व्हिडीओ गेम पार्लर मधील काउंटरवरील पैशांना हात घालून हप्त्याची मागणी करत असे. त्यामुळे या व्यक्तीला आम्ही पार्लरमध्ये येण्यापासून बंदी केली. त्यामुळे सिताराम कदम याला आमच्याबाबत पूर्वीपासूनच मनात राग होता. याचे राजकीय भांडवल करुन गेम पार्लरचा व्यवसाय बंद करणार अशी कायम धमकी तो देत असे.

सर्व गेम पार्लर व्यवसायिक हे जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनच व त्यांनी परवाना दिल्यानंतरच आम्ही हा व्यवसाय चालू करुन आजरोजी पर्यंत शासनाची फी जमा केलेली आहे. हा व्यवसाय हा कायद्यात नमुद केलेल्या कलमानुसार चालवत असून कधीही आम्ही त्याचे उल्लंघन केलेले नाही. परंतु या अर्जात नमूद व्यक्ती काही अल्प संतुष्ट राजकीय पदाधिकारी अशा पदाधिकाऱ्यांना घेऊन आमच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणत आहे. वास्तविक जर आमच्या विरुद्ध कारवाई करायची असल्यास जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या त्या तालुक्याच्या तहसिलदार यांना कारवाई करण्याचे अधिकार दिलेले असतानाही पोलिसांनी ०६ एप्रील २०२४ रोजी छापा टाकून आमच्या व्हिडीओ गेम पार्लर मधुन इलेक्ट्रॉनिक मशिन बळजबरीने काढून नेऊन जप्त केल्या. ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे आमचा परवाना नुतनिकरण करण्यासाठी दिलेला होता. अशा रितीने पोलिस यंत्रणेने आमच्यावर जी कारवाई केली ती बेकायदेशीर असून शासनाने दिलेल्या परवानाचे उल्लंघन करणारी आहे असे आमचे नम्रतापूर्वक म्हणणे आहे.

या घटना घडल्यानंतर यातील सीताराम कदम याने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला भेटण्यास येतो असे सांगितले. सावंतवाडी येथे आमच्या व्हिडीओ गेम पार्लर मधे येऊन मला पंधरा लाख रुपये देत नाही तोपर्यंत तुमच्यावर पोलिस कारवाई करत राहणार. पोलिस हे मी जस सांगतो तसच ऐकणार असल्याने जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत पोलिसांची कारवाई चालू राहणार आहे. त्यामुळे तात्काळ १५ लाख द्यावे असे त्यांनी सांगितले. संबंधित कदम हा आमच्याशी जे बोलला त्याचे व्हिडीओ शुटींग केलेले असून ते यासोबत माहिती करुन देत आहोत.

तर व्हिडीओ गेम चालक गेली कित्येक वर्षे हा व्यवसाय करत असून आमच्या या व्यवसायामुळे कुठलीही व्यक्ती कर्जबाजारी झालेली नाही किंवा त्यामुळे त्याने आत्महत्या केली नाही. जर पोलिसांनी आपले रेकॉर्ड तपासल्यास अशा कोणत्याही स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद झाल्याचे आढळून येणार नाही. परंतु या अर्जात नमूद व्यक्ती ही सूढ भावनेच्या पोटी व आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी तथाकथित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून आमच्यावर कारवाई करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा जो मार्ग काढलेला आहे त्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. सदरचा व्यवसाय हा बँकेकडून आर्थिक सहाय्य घेऊन अनेक अडचणणींना सामोरे जाऊन सुरु केलेला आहे. कोविड महामारीच्या काळात आमचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झालेला होता त्यांत मशिन बंद राहिल्याने त्या नादुरुस्त झाल्या. त्यामुळे आम्ही त्या मशिन बदलून नवीन मशिन घेत कसाबसा व्यवसाय सुरु केला होता. समाजातील अपप्रवृत्तीमुळे आम्ही कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आमच्यावर आमचे कुटुंब अवलंबून असून शिवाय गेम पार्लर मध्ये जे काम करतात त्यांचे कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे अर्जात नमूद व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा