You are currently viewing मनसेच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

मनसेच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

मनसेच्या वतीने खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन…

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य:जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची संकल्पना..

कुडाळ

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित खुली निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतिने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
मानवाच्या प्रगती बरोबर शहराचा सुद्धा प्रचंड वेगाने विस्तार होत आहे. या विस्तारामध्ये बिल्डर बांधकाम विकासाक यांचा मोठा सहभाग असतो; परंतु मानवी हिताकडे दुर्लक्ष करून फक्त स्वार्थी हेतूने बांधकाम परवाना , नियम धाब्यावर बसवून बिल्डर लॉबी ही शासकीय यंत्रणा मॅनेज करून बांधकाम करताना पाहायला मिळतात. आणि हेच बांधकाम भविष्यातील शहरी फ्लॅट्स धारकांची फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. हे होऊ नये म्हणून जनजागृती व्हावी. या उद्देशाने एका वेगळ्या विषयावर या निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोक सजग आणि सज्ञान होतील व भविष्यातील भीषण समस्या उद्भवणार नाहीत. म्हणून हा स्पर्धा प्रपंच.
शहरांची आजची स्थिती पाहता या शहराचा वाली कोण ? कोण भागवणार या कोकणातल्या शहराची तहान? आज ज्यांना नाले म्हणता आहेत ते पूर्वी स्वच्छ पाण्याचे रेन वॉटर ड्रेनस् होते. आता इथेच सिवेज ट्रीट न करताच या नाल्यातून सोडला जातो. झीरो लिक्वीड डिस्चार्ज, रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कायदे आहेत. पण आम्हाला बुरसटलेले शहर हवे आहे.
गोवा, तमिळनाडू मध्ये अश्या नाल्यांवर सुंदर आरच बांधले आहेत. असे आता महाराष्ट्रात फक्त ब्रिटिश कालीन आरच् दिसतात. आरचं बांधणे तर फार दूरचे राहिले आहे.
ज्या प्रदेशात एका बाजूला पश्चिम घाट आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामध्ये अंतर कमी आहे अश्या ठिकाणी आपण कसे शहर डिजाइन केले पाहिजे याची जाणीव नसलेले राजकीय नेते आणि त्यांचे स्थानिक सहयोगी यांना सिंधुदुर्ग मध्ये सांस्कृतिकदृष्ट्या निरक्षर नागरिक तयार करायचे आहेत. भविष्यात सौंदर्यदृष्टी हरवलेली सिंधुदुर्गातील
भकास शहर आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. हे होऊ नये म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने जनजागृतीचा एक प्रयोग , एक प्रयत्न असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
निबंध स्पर्धेची बक्षिस –
प्रथम क्रमांक– 3333 व
सन्मानचिन्ह.
द्वितीय क्रमांक– 2222 व सन्मानचिन्ह.
तृतीय क्रमांक— 1111 व सन्मानचिन्ह.
स्पर्धेचे विषय खालील प्रमाणे..
1) भ्रष्ट शासकीय यंत्रणा बिल्डरांच्या पथ्यावर
2) व्हाईट कॉलर बिल्डर बनले शहरांचे भक्षक
3) सांडपाणी (ड्रेनेज वाॅटर) व्यवस्था भविष्यातील शहरांची डोकेदुखी/ मोठी समस्या
4) बिल्डर शहरांचे विकासक की भकासक. ??
या सापर्धेसाठी अटी व नियम खालील प्रमाणे
1) निबंध स्वःहस्ताक्षरात असावा.
2) निबंध शब्द मर्यादा 700 शब्द.
3) निबंध स्वतःचाच आणि वास्तववादी विचार मांडणारा असावा.
4) निबंध स्पर्धा सिंधुदुर्ग रहिवासी मर्यादित, सोबत आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक.
5) दिनांक 10 जून पर्यंत खालील पत्त्यावर हस्त पोच किंवा पोस्ट/ कुरियर माध्यमातून निबंध पाठवावेत. 10 जून नंतर पोचणारे निबंध स्पर्धेत सहभागी नसतील.
धीरज परब, साई दर्शन बिल्डींग, ब्लाॅक 1 साई मंदिर समोर, हिंदु काॅलनी, ता. कुडाळ ,जिल्हा सिंधुदुर्ग. 416520 या पत्त्यावर निबंध पाठवावेत.
6) निबंध कागदाच्या एका बाजूने लिहिलेला असावा पाठपोठ नसावा.
7) निबंध स्पर्धा खुल्या गटातील राहील.
8) बक्षिस वितरण 14 जुन 2024 रोजी होईल.
9) निबंध सोबत नाव पत्ता संपर्क क्रमांक. नोंद करावी.
अधिक माहीतीसाठी
यतिन माजगावकर– 7666613221, निरंजन रावराणे — 7738470555 यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धाकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा