You are currently viewing सायन रुग्णालयाला नित्यानंद पाटील यांच्या रूपाने हिरा सापडला”

सायन रुग्णालयाला नित्यानंद पाटील यांच्या रूपाने हिरा सापडला”

डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता – लोकमान्य टिळक रुग्णालय

 

मुंबई –

 

वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक नित्यानंद केशव पाटील हे दोन वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी स्वच्छतेची जबाबदारी लिलया स्वीकारली. त्यांच्या रुपाने खऱ्याअर्थाने स्वच्छता ठेवणारा खरा हिरा मिळाला. असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी नित्यानंद पाटील यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना गौरवोद्गार काढले. डॉ . जोशी पुढे म्हणाले, की माझ्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेच्या आयुक्तांनी आम्ही केलेल्या मागणीला मान्यता दिली . त्यामुळे नित्यानंद पाटील यांना संधी मिळाली. इतिहासात अशी घटना प्रथमच घडली आहे. अर्थात पाटील यांनी चांगल्याप्रकारे काम करून पालकत्व स्वीकारले होते. या कामगिरीची खऱ्याअर्थाने दखल घेऊन त्यांना एका वर्षासाठी पुन्हा नियुक्त करण्यात येत आहे. ही खरंच आम्हाला भूषणावह अशीच बाब असल्याचे नमूद केले. उपअधिष्ठाता डॉ. आहुजा, कार्यकारी अधिकारी प्रशासक डॉ. प्रकाश जाधव, यांनी नित्यानंद पाटील यांच्या कामाची पद्धत म्हणजे वस्तुनिष्ठ आराखडा त्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे आपली भूमिका पार पाडली. ते आज सेवानिवृत्त होत असेल तरी डॉ. जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्या सोबत आहेत. डॉ. अर्जुन, डॉ. प्रमोद इंगळे, डॉ. पल्लवी शेळके, डॉ. विलास मोहकर, बाजीराव खैरनार, राजू कांबळे आदींनी नित्यानंद पाटील यांचा मनपा सेवेतील चढता क्रम पाहिला होता. त्यांनी आपल्या कार्याने ठसा उमटवला आहे. असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.

३५ वर्षाच्या कार्यकाळात महापालिकेच्या सेवेत दाखल झाल्यापासून मला माझ्यापरीने सेवा देता आली. याबद्दल समाधानी आहे. या कालावधीत मला लाभलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मुळेच यशस्वी होता आले असे नित्यानंद पाटील यांनी आपल्या सत्कारादाखल बोलताना सांगितले.

प्रारंभी स्नेहल पाटील यांच्या गणेश वंदनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. पत्नी राजश्री पाटील, जावई, नातेवाईक आणि मित्रमंडळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा