You are currently viewing भाजपचे ४०० जागा मिळणार – आमदार नीतेश राणे यांचा दावा

भाजपचे ४०० जागा मिळणार – आमदार नीतेश राणे यांचा दावा

भाजपचे ४०० जागा मिळणार – आमदार नीतेश राणे यांचा दावा..

कणकवली

एक्झिट पोलच्या आकड्यांवर अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून स्वीकारलं आहे. तर महाविकास आघाडीला नाकारले आहे.विरोधकांनी पाकिस्तानच्या हिताचा प्र चार केला. तो प्रचार जनतेने नाकारला आहे. भाजपला 400 पार जागा मिळतील, असा विश्वास भाजप प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केला. आता इंडिया आघाडीमध्ये श्रद्धांजली सभा सुरु झाली आहे. ह्याच उत्तर राऊतांची आजची पत्रकार परिषद पाहिल्या नंतर लक्षात येते, असा टोला राणेंनी लगावला.
एग्जिट पोल संजय राऊतांना मान्य नसेल तर बेस्ट सीएमचा पुरस्कार उद्भव ठाकरेंना द्यायचे त्या कंपन्या आता बंद झाल्यास की त्या ४२० होत्या. त्यावर राऊत असेच बोलणार का ? कालचे एक्झिट पोल खोटे असतील तर तुझ्या मालकाला मिळालेले ते पुरस्कार पैसे देऊन घेतले होते का असा खडा सवाल राणे यांनी केला.राऊतांचा नियम वेगळा आहे. पवार ठाकरेंची खायची पोळी आणि काँग्रेस ची वाजवावी टाळी अशी याची वृती आहे, अशी टीका राणेंनी केली. राऊतांनी स्वतःची लायकी ओळखून मोदी साहेबांवर टीका करावी. 4 जूननंतर राऊतांचे जेल मध्ये जाण्याचे दिवस आले आहेत. भांडूपमधून निघण्याची वेळ आली आहे, अशी टीका राणे यांनी केली. राणेंचा एग्जिट पोल सांगण्यापूर्वीच आम्हाला विजयाची खात्री आहे. विनायक राऊत नावाची भाकरी आता करपलेली आहे आणि ती परतायची आहे हे जनतेने ठेवले आहे. त्यामुळे ४ जून रोजी ते दिसेल आणि भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुद्धा दिसेल असे राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा