“काँम्रेड मॅरेथॉन” स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा धावपटूंची निवड…
“ऑल दि बेस्ट रन”च्या माध्यमातून विशेष शुभेच्छा; युवराज लखम राजेंची उपस्थिती…
सावंतवाडी
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या “काँम्रेड मॅरेथॉन” या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघा धावपटूंची निवड झाली आहे. यात सावंतवाडीतील ओंकार पराडकर व कुडाळ येथील प्रसाद कोरगावकर यांचा समावेश आहे. दरम्यान या दोघांला आज सावंतवाडीतील धावपटूंच्या उपस्थितीत संस्थानचे युवराज लखन राजे भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सिंधू रनर्स, रांगणा रनर्स व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकल स्वार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज सावंतवाडीत ही “ऑल दि बेस्ट रन” घेण्यात आली. सकाळी सहा वाजता राजवाडा परिसरातून ही रन सुरू झाली. यावेळी हातात तिरंगा घेऊन सावंतवाडीच्या मोती तलावाला सात फेऱ्या मारून सहभागी झालेल्या धावपटूंनी पराडकर व कोरगावकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डाॅ. शंतनु तेंडुलकर, डाॅ. प्रशांत मढव, डाॅ. स्नेहल गोवेकर, डाॅ. मिलिंद खानोलकर, डाॅ. अनीष स्वार, डाॅ. उमेश सावंत, मेघराज कोकरे, मेघराज कोकरे, फ्रॅन्की गोम्स, निखिल तेंडोलकर,भूषण बांदेलकर, भूषण पराडकर, अक्षय बांदेलकर, चार्टर्ड अकाऊंटंट सुप्रिया मोडक, प्रसाद बांदेकर, सुजाता रासकर, प्रकाश चव्हाण, नझ़ीर बेग, सुधीर पराडकर, शुभदा रेडकर, सोनाली पराडकर, सिद्धार्थ पराडकर, प्रज्योत राणे, संजय गावडे, प्रथमेश कदम, श्रावणी रेडकर, शुभ्रा रेडकर, श्लोक पराडकर आदी उपस्थित होते.