नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून वापर करावा : वेंगुर्ला नगर परिषदेतर्फे आवाहन
वेंगुर्ला
१ जानेवारीपासून वेंगुर्ला शहरातील नळ कनेक्शन धारकांना नगरपरिषदेमार्फत होणारा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा, असे आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे. निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे चालू असलेले उंची वाढविण्याचे काम, हवामानातील बदल, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करुन १ जानेवारीपासून वेंगुर्ला शहरातील नळ कनेक्शन धारकांना दोन दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे. हा पाणी पुरवठा १ जानेवारीला होणार असून त्यानंतर ४ जानेवारी रोजी पाणी पुरवठा होईल. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी सर्व नळ कनेक्शन धारकांनी याची नोंद घेऊन सहकार्य असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.