जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध उपक्रम
सिंधुदुर्गनगरी
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा, आरोग्य शिबिर, गटचर्चा घेण्यात आली. जिल्हा रुग्णालयच्या वतीने सर्व जिल्हा, उपजिल्हा व ग्रामिण रुग्णालये तसेच प्रा.आ.केंद्र व उपकेंद्रामध्ये वर्षभरात ज्या व्यक्तीने तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची ईच्छा व्यक्त केली त्या व्यक्तीचा सातत्याने सहा महिने पाठपुरावा घेवून त्या व्यक्तीला तंबाखूमुक्त म्हणून घोषीत करण्यात आले. जिल्ह्यातील अशा 154 व्यक्तींचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच ओरोस जिल्हा कारागृह येथे आरोग्य शिबिर आयोजीत करण्यात आले.
जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शाम पाटील, डॉ. चिपळूणकर, डॉ. चेतना चुबे, डॉ. समिर धाकोरकर, वैद्यकिय महाविद्यायलाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. नागरगोजे, नशामुक्ती महाराष्ट्र मंडळ च्या अर्पिता मुंबरकर, केतन कदम, श्रीम. बसावे, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाचे संदिप मोहोड, कार्मिस अल्मेडा, संतोष खानविलकर, रमेश पंडित, हर्षदा मुननकर व स्टाफ नर्स यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली या कार्यक्रमाची प्रस्तावना संदिप मोहोड सायकॉलॉजीस्ट, यांनी केली या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती कार्मिस अल्मेडा यांनी दिली नशामुक्ती बद्दल श्रीमती मुंबरकर यांनी माहिती दिली व आभार प्रदर्शन तृप्ती जाधव यांनी केले.
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ओरोस यांच्यावतीने मुलींच्या रांगोळी, निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे
१) चित्रकला स्पर्धा- १) गणेश नारायण पालव. २) केशव कालीदास कुंभार ३) नेप्सन हिलरी डिसोजा.
२) निबंध स्पर्धा -१) संकेत सत्यवान मडव २) कु. राखी रमेश तांबे ३) साधनादेवी शिवदयाल गौतम.
३) रांगोळी स्पर्धा- १) आरती धुरी व साक्षी गावडे २) सावित्री पाटील ३) सुगंधी घाडीगावकर.
*संवाद मीडिया*
*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘
*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*
🥜 *आमची उत्पादने*🥜
*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*
🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒
*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*
*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*
*अधिक माहितीसाठी संपर्क*
*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*
*🌎 www.sunandaai.com*
*✉️ sunandaaikrushi@gmail.com*
*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*