*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे असंच राहावं*
बारा महिने नदीमधून
वाहत राहो पाणी
बारा महिने गुंजत रहावी
झुळझुळवाणी गाणी
शेततळे हिरवे राहोत
झाडे बहारदार
गुरे ढोरे आनंदात
पक्षी मजेदार
झाडावेलींना झोके देत
वाहत राहो वारा
आभाळात ढग येऊन
बरसत येवोत धारा
हे असंच राहावं म्हणून
आपण काळजी घेऊ
जिथे जिथे असेल माती
तिथे झाड लावू
अनुपमा जाधव