You are currently viewing पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालीत्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सरोज गाजरे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर*

*मानाचा मुजरा*

काव्यप्रकार :- गीत लेखन

( वर्ण १८ , यती दहाव्या स्थानावर )

 

“देश” इतिहास पानोपानी,सांगे सन्मार्ग आचरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवीस, माझा मानाचा मुजरा //ध्रृ//

 

बीड,जामखेड, चौडी गावी, कन्यारत्न जन्मा आले

माणकोजी शिंद्यांची अहिल्या, होळकर स्नूषा झाले

कुंभेर लढाई धारातीर्थी, खंडेराव महेश्वरा //१//

 

मिळकत हक्क विधवेस, नारीशक्ती स्वाभिमान

किल्ले बांधकाम जीर्णोद्धार, पोशिंद्यास बी-बियाणं

कार्य विद्यादान प्रसाराचे, ग्रंथ शिष्य हस्ताक्षरा //२//

 

प्रजाहितदक्ष राणी करी, निरपेक्ष न्यायदान

राज्यकारभार अलौकिक, राज्यकर्ती बहुमान

ऐतिहासिक अहिल्या नाव, कोरले सुवर्णाक्षरा //३//

 

शूर शिवभक्त पापभिरू, “ती” रणांगणी लढाऊ

कर्मयोगिनी ही राज्यकर्ती, तिची शौर्य गाथा गाऊ

रस्ते, धर्मशाळा, अन्नछत्रे, देई पांथस्था आसरा //४//

 

विहिरी, तलाव, कालव्यांनी, वृक्ष समृद्धीचा थाट

क्रांतिज्योती कार्यकुशलता, साक्ष नद्यांवरी घाट

स्री सैनिक सेना उभारूनी, रोवी सम ध्वज धरा //५//

 

पावन प्रतिमा सात्विकाची, नसे भेदभावा थारा

नाही केली गय शिंद्यांचीही, जयगान गातो वारा

अहिल्या भूषण भारताचे,सांस्कृतिक पुण्य धरा //६//

 

सौ. सरोज सुरेश गाजरे

भाईंदर, ठाणे

९८६७३९४००१

प्रतिक्रिया व्यक्त करा