You are currently viewing सिंधुदुर्गात २ ते ४ जून या कालावधीत “यलो अलर्ट”…

सिंधुदुर्गात २ ते ४ जून या कालावधीत “यलो अलर्ट”…

सिंधुदुर्गात २ ते ४ जून या कालावधीत “यलो अलर्ट”…

सिंधुदुर्गनगरी

हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ ते ४ जून या कालावधीत “यलो अलर्ट” देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची शक्यता असून ताशी ४० ते ५० किमी प्रती तास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा