You are currently viewing खारेपाटण येथे देवगडातील ५ शिकारी ताब्यात…

खारेपाटण येथे देवगडातील ५ शिकारी ताब्यात…

खारेपाटण येथे देवगडातील ५ शिकारी ताब्यात…

कणकवली पोलिसांची कारवाई; बंदूक, काडतूसासह बलेनो कार जप्त…

कणकवली

शिकारीच्या उद्देशाने बंदुकीसह काडतूसे घेऊन कारने प्रवास करणाऱ्या देवगड येथील ५ जणांना कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई खारेपाटण येथे करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज त्यांना येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खारेपाटण चेक पोस्ट या ठिकाणी संशयित बलेनो कारमधून देवगड हुन राजापूरच्या दिशेने जात होते. यावेळी चेकपोस्टवर त्याच्या गाडीची तपासणी केली असता गाडीत बंदूक, काडतूसे आढळून आली. या प्रकरणी गाडीत असलेल्या जितेंद्र बाबाजी पाळेकर (वय -४०), संतोष सखाराम पाळेकर (वय ५०), गोपाळ लक्ष्मण पाळेकर (वय -५४, तिघे रा. मुटाट पाळेकरवाडी ता. देवगड), विसंगत विश्वास साळुंखे (वय ३१), विनोद राजाराम साळुंखे (वय ३६ दोघे रा. मुटाट बौद्धवाडी ता. देवगड) यांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत २० हजार रुपये किमतीची बंदूक, ५ जिवंत काडतुसे, ७०० रुपयाची हेडलाईट, आकाशी रंगाचे कव्हर व बलेनो कार ६ लाख असा एकूण ६ लाख २३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेगडे, कॉन्स्टेबल नितीन बनसोडे, विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा