You are currently viewing सांगवेतील मातोश्री वृद्धाश्रमाला खा. नारायण राणे, निलमताई राणे यांची भेट…

सांगवेतील मातोश्री वृद्धाश्रमाला खा. नारायण राणे, निलमताई राणे यांची भेट…

सांगवे

निराधार वृद्धांचा संभाळ करण्यासाठी नारायणराव राणे यांनी स्थापन केलेल्या सांगवे येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे खा. नारायण राणेे व सौ. निलम राणे यांनी दत्त जयंती निमित्त भेट दिली. प्रथम श्री गणेश मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर वृद्धाश्रमातील वृद्धांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.  सर्वांच्या आरोग्याची चौकशी करत निलमताई  यांनी वृद्धांशी गप्पागोष्टी केल्या.

यावेळी वृद्धाश्रमातील  व्यवस्थापक व कर्मचारी हजर होते. सौ नीलम ताई यांच्या भगिनी सुद्धा यावेळी हजर होत्या. खा. राणे आणि निलमताई येथील वृद्धांची जातीनिशी लक्ष देऊन विचारपूस करून काळजी घेत असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा