You are currently viewing पुणे पोर्शे कार प्रकरण….

पुणे पोर्शे कार प्रकरण….

पुणे पोर्शे कार प्रकरण….

ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड…

अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचेही नमुने बदलले

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात नवनवीन माहिती उघड होत आहे. पोर्शे कार अपघातामधील अल्पवयीन आरोपी आणि मित्रांनी मद्य पिऊन गाडी चालवल्याने अपघात चालवल्याचा आरोप त्यांचावर होता.

मात्र, ससून रुग्णालयात या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता या अल्पवयीन मुलाच्या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यामध्येही फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात नवनव्या माहिती उघड होत आहेत. या प्रकरणातीस बिल्डर विशाल अग्रवालचा मुलाच्या पोर्शे कारमधील इतर मित्रांच्या रक्ताचे नमुने देखील बदलल्याची माहिती उघड झाली आहे. पोर्शे कारमधील या मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात मद्याचे अंश आढलले नाहीत. ससून रुग्णालयातील हा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अल्पवयीन आरोपीच्या २ मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरेने किती रक्कम घेतली, अशी चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीसोबत २ मित्र देखील पब आणि हॉटेलमध्ये होते. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरून मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलले, याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ससून रुग्णालयात फेरफार करण्यासाठी बाहेरून आलेले ३ व्यक्ती कोण, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा