*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माऊली*
माय माऊलीची माया
जशी आभाळाची छाया
किती जन्म लागतील
तिचे थोरपण गाया
आई प्रेमाचा सागर
आई दयेचे आगर
आई आधार जीवना
आई मनाची पाखर
कष्ट तिचे घरासाठी
झिजे ती लेकरांसाठी
करी सुखांची पेरणी
दु:ख बांधुनिया गाठी
स्वतः झेलूनी उन्हाला
झाड देतसे सावली
झळा दैन्याच्या सोसूनी
सुख वाटते माऊली
कवयित्री
अनुपमा जाधव