You are currently viewing शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

पुणे :

 

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगावची झूम मीटिंग संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६ मे २०२४ रोज रविवारला संपन्न झाली फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव गणेश कोळी सर यांनी या मीटिंगचे आयोजन व नियोजन केले.

या सभेमध्ये उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष अमरावती येथील डॉ. सतीश तराळ सर राज्य समन्वयक पुणे येथील प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. सुभाष बागल राज्य उपाध्यक्ष वर्धा येथील डॉ. मनीषा रिठे अकोला येथील फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ. अशोक शिरसाट राज्य खजिनदार कवी रामदास कोरडे विदर्भ विभागीय महीला उपाध्यक्षा अकोला येथील डॉ. लताताई थोरात, छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख एडवोकेट सर्जेराव साळवे धाराशिव जिल्हा महिला समन्वयक सरोज कुलकर्णी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार आणि शंकरराव अनासुने सर बुलढाणा जिल्हा सदस्य बाळूभाऊ इटणारे अकोला जिल्हा अध्यक्ष अमोल अनासूने धुळे जिल्हा अध्यक्ष अश्विन अमृतकर सर उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी सर उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक डॉ. राजेश गायकवाड, अहमदनगर आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी फाउंडेशनची पुणे जिल्हा कार्यकारणी घोषित केली ती पुढील प्रमाणे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. सुनील धनगर महिला संपर्कप्रमुख पिंपरी चिंचवड येथील मानसी विजय चिटणीस पुणे जिल्हा समन्वयक विनोद पंचभाई, वारजे पुणे जिल्हा महिला समन्वयक योगिता किरण पाखले, पिंपरी चिंचवड पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.सुरेंद्र चंद्रकांत हेरकळ, हडपसर पुणे जिल्हा सचिव प्रा. शिवदास गोविंदराव मुंडे, हडपसर पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडूखले गुरुजी पुणे जिल्हा उपाध्यक्ष ईश्वरदास मते पुणे जिल्हा महीला उपाध्यक्षा सौ. रुपालीताई चिंचोलीकर पुणे जिल्हा सहसचिव विजय दिगंबर ठोसर पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा महिला सहसचिव सौ. सिमरन ओंकार पाटोळे पुणे जिल्हा संघटक योगेश उंबरकर व भगवानराव उत्तम पवार महिला संघटक सौ. सुनंदा विश्वनाथ सिंगनाथ पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अरुण मेदनकर आळंदी व प्रा. कुलकर्णी जिल्हा महिला प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. स्वातीताई खोपकर पुणे जिल्हा सल्लागार अंबादास सोनार तळेगाव दाभाडे व सौ. पवार मॅडम आदि पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली याप्रसंगी उपस्थित फाउंडेशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. प्रसंगी निवड झालेल्या सर्वांचे मनोगत सुद्धा घेण्यात आले. या प्रसंगी उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये आळंदी देवाची या ठिकाणी घेण्यात येईल अशी घोषणा केली.शेवटी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी सर्वांचे आभार मानलेत तर ही मीटिंग उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र सचिव गणेश कोळी सर यांनी नियोजित केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा