You are currently viewing कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव विभागातील वीज ग्राहकांची कुणकेरी ग्रामपंचायत येथे रविवार ०२ जून रोजी होणार विभागीय बैठक

कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव विभागातील वीज ग्राहकांची कुणकेरी ग्रामपंचायत येथे रविवार ०२ जून रोजी होणार विभागीय बैठक

*कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव विभागातील वीज ग्राहकांची कुणकेरी ग्रामपंचायत येथे रविवार ०२ जून रोजी होणार विभागीय बैठक*

*वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी करणार मार्गदर्शन*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने खंडित वीज पुरवठा होत असून वीज वितरणाबाबत ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. परंतु गेले काही दिवस जिल्हाभरात मान्सून पूर्व पावसात विजेचा खेळखंडोबा सुरू असून महावितरणच्या भोंगळ कारभाराचे दर्शन जिल्हावासियांना झाले आहे. सावंतवाडी तालुक्यातील अनेक गावांना देखील याचा फटका बसला. वीज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला चपराक द्यायची असेल तर वीज ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठीच रविवार दिनांक ०२ जून २०२४ रोजी सायं.४.०० वाजता कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव येथील वीज ग्राहकांची बैठक आयोजित केली आहे.
सदर बैठकीमध्ये वीज ग्राहकांना वारंवार उद्भवणाऱ्या समस्या, कमी दाबाचा वीज पुरवठा, गंजलेले विजेचे खांब, जुनाट वीज वाहिन्या, गिरणी, दुकानदार, व्यावसायिक, शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, वाढीव बिले, लवकरच येऊ घातलेले प्रीपेड मीटर आदी समस्यांबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील गंजलेले वीज खांब, जुन्या वाहिन्या आदींबाबत माहिती घेऊन तसा अहवाल महावितरणच्या वरिष्ठांना पाठविण्या बाबत चर्चा करण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघटनेने यापूर्वी तालुक्यातील बऱ्याच विभागात वीज ग्राहकांच्या बैठका घेतल्या असून त्याला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून अनेक समस्या मार्गी लागल्या, रखडलेली विजेची कामे सुरू झाली काही पूर्णत्वास गेली आहेत. परंतु पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे अजूनही प्रलंबित असून ती पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांवर वीज ग्राहकांचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीच बैठकीचे आयोजन केले आहे. सदर बैठकीत वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा तथा तालुका कार्यकारिणी पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. वीज ग्राहकांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्या असे आवाहन वीज ग्राहक संघटना तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.

*संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा