You are currently viewing लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत युवर चॉईस मुंबई विजेता…

लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत युवर चॉईस मुंबई विजेता…

लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत युवर चॉईस मुंबई विजेता…

मालवण अ संघास उपविजेतेपद; कै. राजू मालवणकर स्मरणार्थ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण

अनामिका राजू मालवणकर प्रायोजित आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन व युअर चॉईस क्रिकेट क्लब, शिवाजी पार्क, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. राजू मालवणकर २०-२० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या अंतिम सामन्यात युवर चॉईस मुंबई संघाने मालवण अ संघाचा ४१ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले.

अंतिम सामना मालवण अ विरुद्ध युवर चॉईस, शिवाजी पार्क, मुंबई यांच्यात बोर्डिंग मैदान येथे झाला. युवर चॉईस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मर्यादित २० षटकात ४ गडी बाद १५६ धावा केल्या. यात सुबीर आचार्य याने ८० आणि तेजस पालकर याने २३ धावा केल्या. मालवण अ संघाकडून रोहित दुखंडे याने २ तर पियूष वस्त आणि मुजावर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरा दाखल खेळताना मालवण अ संघाने सर्वबाद ११५ धावा केल्या. आर्यन वाक्कर याने २७, अभिषेकने २४ तर ओम तोडणकरने १८ धावा केल्या. सुबीर आचार्य याने ३ तर दक्ष पाटील, हर्ष चौधरी, राहुल भगत यांनी प्रत्येकी २ आणि तेजस पालकर याने एक गडी बाद केला. युवर चॉईस संघाने मालवण अ संघावर ४१ धावांनी विजय मिळवला.

मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून सुबीर आचार्य, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पियूष वस्त यांची निवड करण्यात आली. यावेळी मालवणचे माजी उपनराध्यक्ष बबन रेडकर यांच्या हस्ते सुप्रसिद्ध प्रशिक्षक अशोक आस्वलकर यांचा त्यांनी क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन कडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आस्वलकर यांची पत्नी आणि मुलगी सुध्दा उपस्थित होत्या. तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन कडून अनामिका राजू मालवणकर, गोवा येथील पिकॉक फर्मचे मालक व उद्योजक प्रशांत देसाई, गोव्याचे रणजीपटू पराग आमोणकर, मुंबई येथील ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध कमिट्यावर सदस्य म्हणून काम पाहिलेले चंद्रकांत वैद्य, बिपिन मांजरेकर, अनिल सावंत, दिनेश हातीम या सर्वांचा मालवण तालुका क्रिकेट असोसिएशन कडून सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बाबुराव तारी यांनी मालवण स्पोर्टस क्लबने आयोजित केलेल्या २०-२० स्पर्धेत मालवण मधील पाहिले शतक झळकावले म्हणून मान्यवरांच्या हस्ते त्यांना टी शर्ट आणि कॅप देऊन गौरविण्यात आले.

बंटी केरकर आणि मनीष पेडणेकर यांनी पंच म्हणून तर नितेश पेडणेकर यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. यावेळी ज्येष्ठ क्रिकेटपटू नंदन देसाई, जगदीश नेवाळकर, बाबू वायंगणकर, रिझवान शेख तसेच मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनचे बबन रेडकर, अजित मोरे, आप्पा मालंडकर, संदीप शिरोडकर, हेमंत मेस्त, निशिकांत पराडकर, विलास परुळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदन देसाई यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा